ताजी बातमी ऑनलाईन टीम
गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली. तत्पूर्वी संजय राऊत यांची सर. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
न्यायमूर्ती एम. जी. देशापाडे यांच्या न्यायालयासमोर आज सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊत यांच्या वतीने युक्तीवाद केला. तर ‘ईडी’कडून हितेन वेणेगावकर यांनी युक्तीवाद केला.
आठ दिवसांच्या ‘ईडी’ कोठडीची मागणी
. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांचा थेट संबंध आहे. तेच या प्रकरणाचे सूत्रधार आहेत. त्यांना विदेशी दौऱ्यासाठी प्रवीण राऊत यांच्याकडून पैसे मिळत असत.त्यांच्या मालमत्ताची व आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करायची आहे. तसेच संजय राऊत चौकशीला सहकार्य करत नाहीत. त्यांच्याकडून अनेक व्यवहारांची माहिती घेणे आवश्यक आहे. संजय राऊत हे साक्षीदारांवर दबाव आणण्याचा व पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहेत, पुढील चौकशीसाठी संजय राऊत यांना ८ दिवसांच्या कोठडीची मागणी ‘ईडी’ च्या वकिलांनी केली.