Saturday, July 5, 2025
Homeतंत्रज्ञान5G स्पेक्ट्रम लिलावात ‘या’ कंपनीची बाजी, 10 पट अधिक नेटवर्क मिळणार..!!

5G स्पेक्ट्रम लिलावात ‘या’ कंपनीची बाजी, 10 पट अधिक नेटवर्क मिळणार..!!

मोबाईल युजर्ससाठी मोठी बातमी आहे. नागरिकांना ऑक्टोबरपासून 5G सेवांचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी गेल्या 7 दिवसांपासून 5-जी स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया सुरु आहे.. त्यात सर्वाधिक बोली लावून ‘रिलायन्स जिओ’ने बाजी मारलीय.. एकूण स्पेक्ट्रमपैकी जवळ-जवळ अर्धा हिस्सा ‘जिओ’ने आपल्या ताब्यात घेतला आहे.

देशातील 5G स्पेक्ट्रमसाठी झालेल्या लिलावात ‘जिओ’ने 88,078 कोटी रुपयांची बोली लावली. ‘भारती एअरटेल’ने 43,084 कोटी, ‘व्होडाफोन आयडिया’ने 18,799 कोटी रुपयांची बोली लावली. अदानी समूहाने 212 कोटींची बोली लावली. त्यामुळे या लिलावात ‘जिओ’ आघाडीवर असल्याचे दिसते.

केंद्र सरकार मालामाल..

आतापर्यंतच्या 5-G स्पेक्ट्रम लिलावातून केंद्र सरकारला 1 लाख 50 हजार 173 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यात सर्वाधिक 59 टक्के वाटा ‘रिलायन्स जिओ’चा आहे. टेलिकॉमच्या 22 सर्कलमध्ये सर्वाधिक बोली लावणारी ‘जिओ’ कंपनी ठरली. ‘जिओ’ने 700 मेगाहर्ट्जसाठी बोली लावली.

‘जिओ’ने पुढच्या 20 वर्षांसाठी एकूण स्पेक्ट्रमपैकी जवळपास अर्धा हिस्सा घेतला आहे.. या लिलावात ‘जिओ’ने (Jio) 700MHz बँडसोबतच 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 26GHz अशा विविध बँडमध्ये ‘स्पेक्ट्रम’ खरेदी केले आहेत. 700 मेगाहर्टझ बँडमुळे एक टॉवर बऱ्याच मोठ्या क्षेत्राला कव्हर करु शकतो..

भारती एअरटेलने 19,867 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम 43,084 कोटी रुपयांना विकत घेतला, तर ‘व्होडाफोन आयडिया’ने 18,784 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. अदानी समूहाच्या ‘अदानी डेटा नेटवर्कस्’ने 400 मेगाहर्ट्जसाठी 212 कोटींची बोली लावली. 4G नेटवर्कपेक्षा 5G नेटवर्कचा वेग 10 पट जास्त असेल, असं सांगण्यात आले.

येत्या ऑक्टोबरपासून भारतात 5G नेटवर्क सुरू होण्याची शक्यता आहे.. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला.. शिवाय, 2015 ची विक्रमी पातळीही ओलांडली. 2015 मध्ये स्पेक्ट्रमच्या लिलावातून केंद्र सरकारला 1.09 लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला होता.

याबाबत आकाश अंबानी म्हणाले, की “देशातील सगळ्यात स्वस्त, तसेच जागतिक पातळीवरील मानकांनुसार 5-G इंटरनेट सेवा देणार आहोत. देशातील डिजिटल क्रांतीला ‘जिओ’ आणखी गती देईल. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारत नवीन आर्थिक महाशक्ती होईल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -