शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. खासदार राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांची आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अशातच शिवसेनेपाठोपाठ मनसेत देखील मोठं खिडार पडलं आहे. मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धक्का बसला आहे. मनसेचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह 65 जणांचा शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. अतुल भगत यांनी मनसेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणला. आता राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज पुण्याचा दौरा करणार आहेत. अतिवृष्टी, पेरणी आणि विकासकामांबाबत ते आढावा घेणार आहेत. अशातच युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देखील पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या तोफा एकमेकांच्या विरोधात धडाडणार आहेत.