शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. खासदार राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली असून त्यांची आज पुन्हा चौकशी सुरू आहे. संजय राऊतांच्या ED चौकशीतून नवी माहिती समोर आली आहे. त्याआधारे ईडीच्या पथकाने मुंबईत 2 ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी मुंबईत दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. तसेच नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातही हेरॉल्ड हाऊसवर छापा टाकला. ईडीच्या पथकाने सकाळीपासून तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. -दोन छापे हे पत्राचाळ प्रकरणी तर एक छापा हा नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, शिवसेनेपाठोपाठ मनसेत देखील मोठं खिडार पडलं आहे. मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धक्का बसला आहे. मनसेचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह 65 जणांचा शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. अतुल भगत यांनी मनसेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणला. आता राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.