Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगआमदारांच्या निलंबन प्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीकडे देशासह महाराष्ट्राचं लक्ष

आमदारांच्या निलंबन प्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीकडे देशासह महाराष्ट्राचं लक्ष

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या परस्परविरोधी याचिकांवरील सुनावणी गुरुवारी सुप्रीम कोर्टात (Supreme court) पार पडली.

उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हरिश साळवे, नीरज कौल, महेश राम जेठमलानी या वकिलांनी बाजू मांडली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार, दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं, हाच एक पर्याय असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तर आम्ही पक्ष सोडलाच नसल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागूच होत नसल्याचा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला. दरम्यान, सुप्रीम कोर्टातील(Supreme court) या याचिकांवरील सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे. आज 04 ऑगस्ट रोजी कोर्टाच्या पटलावर पहिल्याच क्रमांकावर ही याचिका सुनावणीसाठी घेतली जाईल, असे न्यायमूर्तींनी जाहीर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -