Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगराज्यात 9 ऑगस्टपासून परिवर्तन क्रांती : संभाजीराजे

राज्यात 9 ऑगस्टपासून परिवर्तन क्रांती : संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून परिवर्तन क्रांतीची घोषणा केली असून, 9 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथून याला सुरुवात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात ट्विट करत ही माहिती दिली. येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या मुहूर्तावर आपल्या समर्थकांना तुळजापूरमध्ये एकत्र येण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. यानंतर आता संभाजीराजे छत्रपती नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ
संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगितले होते. यासोबतच स्वराज्य या संघटनेची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले होते. त्यामुळे संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर येथे नेमके काय केले जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

परिवर्तन क्रांतीची सुरुवात तुळजापूरहूनच का?

काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत आहेत. त्यामुळे तेथे ते कोणती घोषणा करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -