राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येऊन आता तब्बल 35 दिवस उलटले आहे. तरीही अद्याप राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीमुळेही सरकारचे भवितव्य अधांतरी होत असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचे बोलले जात आहे. भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन आता अवघा 10 दिवसांवर आलेला आहे. अशावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. त्याबद्दल मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार हा 15 ऑगस्टपुर्वी फिक्स होणार असल्याचे सांगितले. यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असून 15 ऑगस्टला झेंडावंदन असल्याने त्यापुर्वी मंत्रीमंडळ विस्तार नक्की होईल, असे मुनगंटीवार म्हणालेत.
मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली! मुनगंटीवारांनीच सांगितलं…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -