Saturday, November 9, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात 24 तास वीजपुरवठा होणार..? महावितरणच्या ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या…

राज्यात 24 तास वीजपुरवठा होणार..? महावितरणच्या ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या…

राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.. सततच्या भारनियमनामुळे वैतागलेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.. राज्यात लवकरच 24 तास वीजपुरवठा केला जाणार असल्याचे समजते.. तशी घोषणा महावितरणकडून करण्यात आली आहे..

याबाबत महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी माहिती दिली.. ते म्हणाले, की “गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विजेची मागणी वाढली आहे.. विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी ‘महावितरण’ची वीज वितरण प्रणाली आणखी सक्षम करावी लागणार आहे.. राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल 39,602 कोटींची गरज आहे..”

ग्राहकांना मिळणार 24 तास वीज

वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठीच सुधारित वितरण क्षेत्र योजनेपैकी 14,266 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.. त्यातून राज्यातील विविध ठिकाणी 377 नवीन उपकेंद्रे उभारली जातील. त्यामुळे वीजपुरवठ्यात सुधारणा तर होईलच, शिवाय ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा सिंघल यांनी केला आहे.

ते म्हणाले, की “या निधीतून राज्यातील 299 उपकेंद्रांत अतिरिक्त रोहित्रे बसविले जातील.. 292 उपकेंद्रांची क्षमता वाढवली जाईल व सुमारे 29,893 नवीन रोहित्रे बसविली जातील. शिवाय उच्चदाब भूमिगत वाहिनी टाकण्यात येणार आहे.. त्यामुळे ग्राहकांना 24 तास अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा केला जाईल..”

‘ही’ योजना राबवणार…

केंद्र सरकारच्या मदतीने महावितरण लवकरच सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबवणार आहे. त्यामुळे वीज वितरण प्रणालीत आमूलाग्र बदल होतील. केंद्राच्या आर्थिक मदतीतून वीज वितरण पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, वीजपुरवठ्याची गुणवत्ता व उपलब्धता यात सुधारणा करणार असल्याची माहिती सिंघल यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -