भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पाचव्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने अखेरचा सामना जिंकत 4-1 ने टी-20 मालिका आपल्या खिशात घातली आहे. भारतीय संघात 4 बदल करण्यात आले होते. कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती देण्यात आली होती.
भारताकडून श्रेयस अय्यरने आपली 64 धावांची अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाने 20 षटकात 7 बाद 188 एवढी मोठी धावसंख्या उभारली आणि वेस्टइंडिजला विजयासाठी 189 धावांचे तगडे आव्हान दिले. याशिवाय दीपक हुड्डाने 38 धावा, हार्दिक पंड्याने 16 चेंडूत 28 धावा यांनी आकर्षक खेळी केली.
भारताचे युवा गोलंदाज रवी बिश्नाेई (4/16), सामनावीर अक्षर पटेल (3/15), कुलदीप यादव (3/12) यांनी वेस्ट इंडिजचा आपल्या सर्वाेत्तम खेळीतून पाचव्या टी-20 सामन्यामध्ये धुव्वा उडवला. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा फक्त 15.4 षटकांत 100 धावांवर संपूर्ण संघ बाद करत 88 धावांनी पराभव केला.
वेस्ट इंडिजकडून शिमराेन हेटमेयरने 56 धावा करत एकाकी झुंज दिली.
भारतीय संघ – ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दीक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, आवेश खान, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आणि अर्शदीप सिंह
वेस्ट इंडीज संघ – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.