Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: आठवड्यात राधानगरी धरण भरण्याची शक्यता

कोल्हापूर: आठवड्यात राधानगरी धरण भरण्याची शक्यता

 गेल्या १५ दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसाने मोठा दिलासा दिलासा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उभ्या पिकांना वरदान मिळाले आहेच, त्याचबरोबर धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे.

राधानगरी धरणात(Radhanagari dam) आतापर्यंत ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास या आठवड्यामध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांमध्ये धरण परिसरामध्ये १३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संभाव्य पुरस्थितीचा अंदाज घेऊन पाटबंधारे विभागाकडून वीज निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तब्बल गेल्या दोन आठवड्यापासून पूर्णतः दडी मारलेल्या मान्सूनने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे.

गेल्या २४ तासांपासून होत असलेल्या सरीवर सरींमुळे जिल्ह्यातील उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने सोयाबीन तसेच भुईमूग पिकाला विशेष करून जीवदान मिळाले आहे. शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्याचबरोबर उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या होत्या. त्यामुळे हाताला आलेली उभी पिके जातात की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी(Radhanagari dam), तसेच भुदरगड या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली.

जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रांमध्ये जोरदार वृष्टी झाल्याने पाण्याच्या पातळीत आहे. यामुळे यंत्रणाही सतर्क झाले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे. दरम्यान, राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून आज दुपारी ४ वाजेपर्यंत धरण ७९ टक्के भरले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, पावसाने पुन्हा जोर धरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात दिवसभरात गगनबावडा तालुक्यात  ९७.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील राधानगरी धरणात १८८.८४ दलघमी पाणीसाठा आहे. दुपारी ४ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून(Radhanagari dam) १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील – इचलकरंजी, शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई हे ५ बंधारे आणि दूधगंगा नदीवरील दत्तवाड हा १ बंधारा पाण्याखाली आहे. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.

राधानगरी १८८.८४ दलघमी, तुळशी ७९. ३३ दलघमी, वारणा ७९२.८३ दलघमी, दूधगंगा ५२६.४० दलघमी, कासारी ६०.४० दलघमी, कडवी ६०.६७ दलघमी, कुंभी ५९.८५ दलघमी, पाटगाव ८३.०२ दलघमी, चिकोत्रा ३६.४३ दलघमी, चित्री ५०.३९ दलघमी, घटप्रभा ४०.९५ दलघमी, आंबेआहोळ ३०.९८ जंगमहट्टी व जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -