गोवा पोलीस दलात नेमणूकीस असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने(Sub-Inspector) एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिला कोल्हापुरात हॉटेलवर आणून अत्याचार केला. पिडीत महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विराग पवार (रा.सालसेंट,दक्षिण गोवा) असे संशयीताचे नाव आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.
पंचवीस वर्षाची पिडीत महिला विवाहित असून तिला मुले आहेत. १२ जुलै, २०२२ रोजी पिडीत संशयीत पवार गोव्यातील ज्या पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहे, त्या ठिकाणी नातेवाईक बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यासाठी गेली होती. यावेळी पवारशी तिची ओळख झाली. उपनिरीक्षक (Sub-Inspector) पवारने पिडीतेच्या नातेवाईकाला शोधून काढण्यासाठी मदत केली, त्यावेळी पवारने तिचा मोबाईल नंबर घेतला होता.
त्यानंतर ते एकमेकांशी संभाषण व सोशल मिडीयावर चॅटींग करू लागले. ‘तु मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करून मुलांचाही सांभाळ करण्यास तयार आहे’ असे आमिष दाखवून तिला फिरण्यासाठी महाबळेश्वर येथे नेले. १९ ते २१ जुलै या दरम्यान कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आणून अत्याचार केला. पिडीत महिलेने गोवा व कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक(Sub-Inspector) श्वेता पाटील पुढील तपास करीत आहेत.