Tuesday, December 16, 2025
Homeब्रेकिंग'सोलापूर अन् कोल्हापूर' पोरकाच, मंत्रिमंडळातून पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्हे वगळले

‘सोलापूर अन् कोल्हापूर’ पोरकाच, मंत्रिमंडळातून पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्हे वगळले

राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिमंपदाची शपथ दिली. भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला झुकते माप मिळाले आहे. तर, पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला तीनच मंत्रीपदे आली आहेत. मात्र, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे, हे दोन्ही जिल्हे सध्यातरी पोरकेच आहेत.

शिंदे सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, उत्तर महाराष्ट्रातील 5 आमदारांना मंत्रीपद मिळालं असून मराठवाड्याच्या खात्यात 4 मंत्रीपदे देण्यात आली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात केवळ 3 मंत्रीपदं देण्यात आली असून कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा या मंत्रिमंडळ विस्तारातून वगळण्यात आल्याचे दिसून आले. सोलापूरातून एकमेव बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील शिंदे गटात सामिल होते. तर, कोल्हापूरातून माजी राजेश क्षीरसागर हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांना मंत्रीपदी संधी मिळाली नाही. चंद्रकांत पाटील हे मूळ कोल्हापूरचे असले तरी त्यांचा विधानसभा मतदारसंघ हा पुण्यातील कोथरुड आहे. त्यामुळे ते पुण्याचे मंत्री राहतील.

दरम्यान, सोलापूरातील भाजप नेते विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना मंत्रीपदाची संधी देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनाही मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे, सोलापूर जिल्हाही पोरकाच राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हा पोरकाच राहिला आहे. प. महाराष्ट्रातील 3 जणांना मंत्रीपद देण्यात आलं असून त्यात, पुणे, सांगली आणि सातार जिल्ह्यांना स्थान मिळालं आहे.

उत्तर महाराष्ट्र
१. राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी (उत्तर महाराष्ट्र) २. गिरीश महाजन – जामनेर, जळगाव (उत्तर महाराष्ट्र) ३. गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (उत्तर महाराष्ट्र) ४. दादा भुसे – मालेगाव बाह्य (उत्तर महाराष्ट्र) ५. विजयकुमार गावित – नंदुरबार (उत्तर महाराष्ट्र)

मराठवाडा
१. संदीपान भुमरे – पैठण (मराठवाडा) २. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद (मराठवाडा) ३. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद (मराठवाडा) ४. अतुल सावे – औरंगाबाद पूर्व (मराठवाडा)

पश्चिम महाराष्ट्र
१. चंद्रकांत पाटील – कोथरुड, पुणे (पश्चिम महाराष्ट्र) २. सुरेश खाडे – मिरज (पश्चिम महाराष्ट्र) ३. शंभुराज देसाई – पाटण, सातारा (पश्चिम महाराष्ट्र)

विदर्भ
१. सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर (विदर्भ) २. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ (विदर्भ)

कोकण
१. उदय सामंत – रत्नागिरी (कोकण) २. दीपक केसरकर – सावंतवाडी (सिंधुदुर्ग)

मुंबई, ठाणे
१. रवींद्र चव्हाण – डोंबिवली (ठाणे) २. मंगलप्रभात लोढा – मलबार हिल, मुंबई (मुंबई)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -