Tuesday, December 16, 2025
Homeक्रीडापोलार्ड 600 टी 20 मॅच खेळणारा पहिला क्रिकेटर!

पोलार्ड 600 टी 20 मॅच खेळणारा पहिला क्रिकेटर!

वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड 600 टी 20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. द हंड्रेड लीगमध्ये लंडन स्पिरिट संघाकडून खेळताना त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली. (todays latest cricketnews) मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्धच्या या सामन्यात पोलार्डने आपली खास कामगिरी एका खास पद्धतीने साजरी केली आणि 11 चेंडूत 34 धावांची तुफानी खेळी केली. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आपला 600 वा सामना खेळत पोलार्डने चार षटकार आणि एक चौकार लगावले.
टी 20 क्रिकेटमध्ये 600 धावा करून एखाद्याची कारकीर्द संपते, पण कॅरेबियन दिग्गज खेळाडू पोलार्डने 600 सामने खेळून महाविक्रम केला आहे. त्याने 600 सामन्यांमध्ये 31.34 च्या सरासरीने 11 हजार 723 धावा केल्या आहेत. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या 104 आहे. पोलार्डने टी 20 फॉरमॅटमध्ये एक शतक आणि 56 अर्धशतके झळकावली आहेत. (todays latest cricketnews) त्याने 15 धावांत 4 बळी घेऊन सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले असून एकूण कारकिर्दीत त्याने 309 बळी घेतले आहेत.

नुकताच लॉर्डसच्या मैदानावर झालेल्या सामन्यात नेदरलँडचा वेगवान गोलंदाज फ्रेड क्लासेनच्या शेवटच्या षटकात पोलार्डने दोन षटकारांच्या मदतीने 12 धावा वसूल केल्या आणि या षटकात एकूण 15 धावा झाल्या. पोलार्ड फलंदाजीला आला तेव्हा 30 चेंडू बाकी होते. यातील 11 चेंडू खेळत त्याने 34 धावा फटकावल्या. सलामीवीर जॅक क्रोली (41 धावा) आणि कर्णधार मॉर्गन (37) यांच्यानंतर तो आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज होता. पोलार्डच्या संघाचा 52 धावांनी विजय या सामन्यात पोलार्डचा संघ लंडन स्पिरिटने प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावून 160 धावा केल्या. प्रत्युत्तरात मँचेस्टर ओरिजिनल्सचा संघ दोन चेंडू शिल्लक असताना 108 धावांवर ऑलआऊट झाला. यासह लंडन संघाने हा सामना 52 धावांच्या फरकाने जिंकला. मँचेस्टरसाठी फक्त फिलिप सॉल्ट (36), सीए अॅबॉट (10) आणि टॉम हार्टले (17) यांनाच फक्त दुहेरी आकडा गाठता आला.

लंडन संघाकडून जॉर्डन थॉम्पसनने सर्वाधिक चार विकेट पटकावल्या. तर मसून क्रेन आणि लियाम डेव्हिसन यांनी प्रत्येकी दोन आणि ख्रिस वुडने एक विकेट घेतली. त्याचवेळी, वॉल्टरने मँचेस्टरसाठी शानदार गोलंदाजी केली आणि 20 चेंडूत केवळ 18 धावा देत दोन विकेट घेतल्या. पोलार्डने अनेक T20 संघ/फ्रेंचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेषत: वेस्ट इंडिजमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो, इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्ये मुंबई इंडियन्स, बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स, बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) ढाका ग्लॅडिएटर्स, ढाका डायनामाइट्स, पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज, मुलतान सुलतान आणि पेशावर झल्मी या संघांसाठी तो खेळला आहे. किरॉन पोलार्डनंतर त्याचाच देशबंधू ड्वेन ब्राव्हो टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 543 सामने खेळले आहेत, तर पाकिस्तानी दिग्गज शोएब मलिकने आतापर्यंत 472 टी 20 सामने खेळले आहेत. ख्रिस गेलने 463 सामने खेळले आहेत आणि रवी बोपाराने देशाव्यतिरिक्त वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी 426 सामने खेळले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -