मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.या विस्तार प्रक्रियेमध्ये भाजप पक्षाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली.आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी चार वेळा आमदार आणि मिरजेच्या इतिहासात तीन वेळा आमदार होऊन नवा इतिहास रचला भाजप पक्षाचे एकनिष्ठ आणि मागासवर्गीय समाजाचे तडफदार नेतृत्व त्यांची कॅबिनेट मंत्री पदासाठी भाजप पक्षाकडून यांची कॅबिनेट मंत्री पदासाठी निवड झाली.आमदार सुरेश भाऊ खाडे यांना मंत्रिपदाची शपथ विधी घेताना टीव्ही वर सर्वांचे लक्ष केंद्रित होते.आमदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.
आमदार सुरेश भाऊ खाडे यांची शपथविधी पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी या जल्लोषात शामिल झाले होते.सांगली जिल्हा शहर अध्यक्ष दीपक बाबा शिंदे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी ,माजी महापौर संगीता खोत पांडुरंग कोरे विठठल तात्या खोत दिगंबर जाधव ज्योती कांबळे महादेव कुरणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.




