Wednesday, December 17, 2025
Homeब्रेकिंगशिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळालं कोणतं खातं?

शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळालं कोणतं खातं?


राज्यात नवं सरकार स्थापन होऊन महिना उलटल्यानतंर अखेर आज मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये सरकारमधील एकूण 18 मत्र्यांचा शपथविधी आज पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे 9 तर भाजपच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. आज सकाळी मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर संध्याकाळी खातेवाटप देखील जाहीर करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण खाते राहणार असून, गृह, वित्त आणि महसूल ही तिन्ही महत्त्वाची खाती भाजपला मिळाली आहे. गृह खातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.



पाहुयात कोणाला मिळालं कोणतं खातं?
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
गिरीश महाजन – जलसंपदा
दादा भुसे – कृषी
अतुल सावे – आरोग्य
सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
संजय राठोड – ग्रामविकास
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
उदय सामंत – उद्योग
शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
संदीपान भुमरे – रोजगार हमी
दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
सुरेश खाडे – सामाजिक न्याय

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -