मिरज; मिरज-परळी, सांगली-मिरज, मिरज-कोल्हापूर आणि कोल्हपूर-मिरज डेमू दि. 15 ऑगस्टपासून पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झवर यांनी दिली.
कोरोनामध्ये पंढरपूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु डेमू मात्र बंदच होती. त्या देखील आता पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. मिरज-परळी डेमू दि. 15 पासून तर परळी-मिरज डेमू दि. 16 पासून सुरू होत आहे. ही गाडी मिरजेतून रात्री 9 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 6.10 वाजता परळी येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ती गाडी परळी येथून सकाळी 7.25 वाजता सुटेल व मिरजेत सायंकाळी 5.55 वाजता येईल.
या गाडीला दहा सेकंड क्लास कोच जोडण्यात आले असून आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव, जतरोड, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, येडशी, ढोकी, औसा, लातूर, लातूर रोड, वडवल नागनाथ, जानवल, कारेपूर, पानगाव आणि घाटनंदूर इत्यादी स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.
मिरज-परळी, मिरज-कोल्हापूर डेमू पूर्ववत सुरू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -





