Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरशिवाजी विद्यापीठाच्या आज, उद्याच्याही परीक्षा स्थगित

शिवाजी विद्यापीठाच्या आज, उद्याच्याही परीक्षा स्थगित

अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या 12 व 13 ऑगस्ट रोजी होणार्‍या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा (exam) स्थगित करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे 10 व 11 ऑगस्ट रोजी होणार्‍या परीक्षा यापूर्वीच स्थगित करण्यात आल्या आहेत.

पूर परिस्थिती कायम असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी 12 व 13 ऑगस्ट रोजी होणार्‍या सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा (exam) स्थगित करण्यात येत आहेत. याबाबतची माहिती प्राचार्य, अधिविभाप्रमुख, सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी. स्थगित परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह यादव यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -