आज होणार सोनी टीव्हीवर प्रक्षेपण
महानायक अमिताभ बच्चन होस्ट करीत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती सिझन 14’ च्या शो मध्ये शिरोळ तालुका शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील शशांक रामचंद्र चोथे सहभागी होत आहेत. शशांक चोथे आपल्या वडिलांप्रमाणे पुरातन वस्तू संग्रहालयाचे ऐतिहासिक वारसा स्थळे याचे अभ्यासक असून खिद्रापूर येथे शासकीय स्तरावर येणाऱ्या पर्यटनाबाबत माहिती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना तसेच अन्य पर्यटकांना खिद्रापूरचा मंदिराचा पूर्ण इतिहास व संपूर्ण मंदिराची माहिती अत्यंत ओघवत्या भाषेत सांगून लोकांना मंत्रमुग्ध करत असतात. हे हे काम ते मनापासून करत असतात याची त्यांना आवड आहे. खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचा पर्यटन म्हणून विकास व्हावा अशी त्यांची धारणा असून यासाठी ते व त्यांचे वडील रामचंद्र चोथे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. शशांक हे अलिकडेच उरुण इस्लामपूर येथे शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. तसेच गेली कित्येक वर्षे ते खिद्रापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि पर्यटन विकासासाठी कार्य करीत आहेत.
Kolhapur; ‘कौन बनेगा करोडपती शो’मध्ये कोल्हापूरच्या शशांक चोथे यांचा सहभाग
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -