शित्तूर-वारुण; चांदोली धरणक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावस रल्याने धरणातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. परिणामी गेल्या पाच दिवसांपासुन पुराच्या पाण्याखाली गेलेले शित्तुरआरळा, सोंडोली-चरण हे पूल वाहतुकीसाठी पूर्णतः खुले झाले आहेत. यामुळे नदीकाठचे विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे.
वारणेस आलेल्या पुरामुळे शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील उखळू, शित्तूर-वारूण, शिराळे-वारूण, खेडे, सोंडोली, मालेवाडी, जांबुर, मालगाव, कांडवण आदी गावांचा व येथील वाड्यावस्त्यांचा शिराळा तालुक्याशी व येथील बाजारापेठांशी संपर्क तुटला होता. तो आता पूर्ववत सुरू झाला आहे. पुराचे पाणी कमी झाल्याने नदीकाठच्या शेकडो एकर शेतीतील ऊस व भात पिकांनी आज मोकळा श्वास घेतला आहे.
कोल्हापूर : वारणा नदीचा पूर ओसरला; शित्तुर-आरळा, सोंडोलीचरण पूल वाहतुकीसाठी खुले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -