Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगशिंदे गटातील ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

शिंदे गटातील ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास ४० दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पावासाळी अधिवेशनाच्या अगोदर राज्य सरकारचा निर्णय
आजपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर केवळ १८ मंत्र्यांचेच खातेवाटप करण्यात आलं आहे. बाकीची उर्वरीत खाती ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राखून ठेवण्यात आली होती. मात्र, अधिवेशन काळात विरोधक या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करु शकते. त्यामुळे अधिवेशन सुरु होण्याअगोदरच शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे या अतिरिक्त खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणते अतिरिक्त खाते

उदय सामंत – माहिती आणि तंत्रज्ञान
शंभूराज देसाई- परिवहन
दादा भूसे- पणन
संजय राठोड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
तानाजी सावंत- मृद व जलसंधारण
अब्दुल सत्तार – आपत्ती व्यवस्थापन
दीपक केसरकर- पर्यावरण व वातावरणीय बदल
संदीपान भुमरे- अल्पसंख्याक व औकाफ

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -