ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेत्री जैकलीन फर्नांडीसच्या अडचणीत वाढ वाढल्या आहेत. आयकर विभागानं २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालयच्या मते, जॅकलीन फर्नांडीसला आधीपासूनच माहित होतं की, सुकेश एक खंडणीवसुली करणारा अपराधी आहे. तसेच तिला हे देखील माहित होतं की, सुकेश लोकांकडून जबरदस्ती खंडणी वसुली करतो. यामुळेच सक्तवसुली संचालनालयाने (ED) आता जॅकलीनवर आरोपपत्र दाखल केलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणात चांगलेच चर्चेत आहे. ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी तिचे नाव जोडलं गेले होते. यामुळे जॅकलिन ही आयकर विभागाच्या रडारवर होती. या काळात जॅकलिनची कसून चौकशी देखील झाली होती. मात्र स्वतःवर लावण्यात आलेल्या आरोपांचं जॅकलिननं खंडन केलं होतं. तर दुसरीकडे सुकेश हा गुन्हेगार आणि खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलिनला यापूर्वीच होती, असा दावा ईडीने केला आहे.