ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली; प्लॉट दाखविण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिक माणिकराव विठ्ठल पाटील (वय 54, रा. इंद्रनील प्लाझा अपार्टमेंट, राममंदिर, सांगली) यांचे अपहरण करण्यात आले आहे. तुंग (ता. मिरज) येथे दि. 13 ऑगस्टरोजी रात्री साडेआठ ते पावणेनऊ या वेळेत ही घटना घडली.
पाटील यांचा मुलगा विक्रमसिंह पाटील (वय 28) यांनी सोमवारी रात्री सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहृत पाटील यांचा जमीन खरेदी करून त्यावर बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे.
दि. 10 ऑगस्टपासून त्यांच्या मोबाईलवर एक व्यक्ती फोन करीत होती. ही व्यक्ती तुंग परिसरात प्लॉट पाहण्यास येण्यासाठी आग्रह करीत होता. पाटील यांना वेळ नव्हता. त्यामुळे ते लगेच गेले नाहीत. परंतु संबंधित व्यक्ती सातत्याने फोन करू लागल्याने पाटील यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी येतो, असे सांगितले. पाटील यांना दिवसभर वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने त्यादिवशी सायंकाळी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी रात्री साडेआठ वाजता येतो, असे सांगितले. त्यानुसार ते कारने (क्र. एमएच 10 सीएन-6864) तुंगला गेले.
सांगलीच्या बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण; कारमधूनच पळविले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






