Monday, April 22, 2024
Homenewsविट्यात दवाखान्याचा छत कोसळून महिला रुग्ण ठार

विट्यात दवाखान्याचा छत कोसळून महिला रुग्ण ठार


विट्यात दवाखान्याच्या इमारतीचा छत कोसळून एक रुग्ण महिला जागीच ठार झाली तर तिची सख्खी बहिण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २१) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विट्यात लेंगरे रस्त्यावर डॉक्टर दीपक कुलकर्णी यांचे आशिर्वाद क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. या दवाखान्यात तपासणीसाठी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आयटीआय कॉलेज समोरील अनिता सुरेश माळी (वय ४०) आणि त्यांची बहिण अलका बबन शिंदे (वय ४५) या आल्या होत्या.

डॉक्टर दुसरे रुग्ण तपासत असल्याने त्या दोघीही बाहेर दवाखान्याच्या पायरीवर बोलत बसल्या होत्या. अचानक साडेपाच वाजण्याच्या दरम्यान या दवाखान्याच्या इमारतीच्या पुढील छताचा भाग अनिता माळी आणि अलका शिंदे यांच्या अंगावर कोसळला.

या दुर्घटनेत अनिता माळी यांच्या डोक्याला आणि मेंदूला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अलका शिंदे यांच्या डोक्यास व कंबरे खालील भागास जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अलका शिंदे यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -