स्वातंत्र्यदिनानिमित्त कंपनीवर फडकवलेला तिरंगा ध्वज (har ghar tiranga) काढताना शेडवरून पडल्याने नरेशसिंह पूनमसिंह चौहान (वय 18, रा. श्री मार्बल सेंटर, शिरोली, सांगली फाटा, मूळ गाव करालीया, जिल्हा पाली, राजस्थान) याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. (har ghar tiranga) श्री मार्बल सेंटरच्या इमारतीवर ध्वज फडकवला होता. तो सायंकाळी उतरवताना नरेशसिंह 35 फुटांवरून खाली पडला.
यात तो गंभीर जखमी झाला. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.