वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बॉव्वे दौऱ्यावर गेला असून भारत आणि झिम्बाब्वे(India vs Zimbabwe ODI Series) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेला आज 18 ऑगस्ट 2022 पासून सुरुवात होणार आहे. या सामन्यांमध्ये अधिक युवा खेळाडू खेळवण्याची टीम इंडियाची तयारी असेल.
वॉशिंग्टन सुंदरची भारतीय संघात झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली होती. पण त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी शाहबाज अहमदचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय राहुल त्रिपाठीचादेखील संघात समावेश असेल. तब्बल 6 वर्षानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे.
वनडे मालिकेबद्दल अधिक बोलायचं झालं तर भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल ते तर उपकर्णधार शिखर धवन असणार आहे. तर अलीकडच्या काळात आपलं दमदार कमबॅक करणारी टीम झिम्बाब्वेचं नेतृत्व क्रेग इर्विनच्या अनुपस्थितीत रेजिस चकाब्वा करणार आहे.
भारत-झिम्बाब्वेमधील आजचा पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होईल. टॉस सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण आपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकाल. ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही Sony LIV App वर देखील पाहू शकता.
भारत vs झिम्बॉव्वे: वनडे सामन्यांचे वेळापत्रक
▪️ पहिला वनडे सामना 18 ऑगस्ट हरारे स्पोर्ट्स क्लब
▪️ दुसरा वनडे सामना 20 ऑगस्ट हरारे स्पोर्ट्स क्लब
▪️ तिसरा वनडे सामना 22 ऑगस्ट हरारे स्पोर्ट्स क्लब