Saturday, March 15, 2025
Homeतंत्रज्ञानTATA ने लाँच केली फक्त 6.45 लाख रुपयांची कार, फीचर्स वाचून व्हाल...

TATA ने लाँच केली फक्त 6.45 लाख रुपयांची कार, फीचर्स वाचून व्हाल आश्चर्यचकीत!

टाटा मोटर्स कंपनीकडून भारतीय कार बाजारात आपली पकड मजबूत करण्याचे काम सुरूच आहे. नवनवीन गाड्या लाँच करण्याव्यतिरिक्त, कंपनी वेळोवेळी नवीन व्हेरिएंट बाजारामध्ये आणत असते. काही दिवसांपूर्वी टाटा मोटर्सने आपल्या टिगोर सेडान कारची ड्युअल टोन वर्जन सादर केली होती. आता कंपनीने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक कार टाटा टिगोरचा (Tata Tiago) XT Rhythm व्हेरिएंट बाजारात आणला आहे. कंपनीने या वेरिएंटची किंमत फक्त 6.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. नवीन व्हेरियंट Tiago च्या मिड-व्हेरियंट XT आणि टॉप व्हेरिएंट XZ+ मध्ये आणले गेले आहे. हे Tiago XT पेक्षा 30 हजार रुपयांनी महाग असेल.

या व्हेरिएंटमध्ये आहे बरेच वैशिष्ट्ये –
टाटा टियागोचा हा नवीन व्हेरिएंट वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. यात Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. चांगल्या म्युझिकसाठी चार स्पीकर आणि चार ट्वीटर उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे इमेज आणि व्हिडिओ प्लेबॅकसोबतच व्हॉईस कमांडचाही सपोर्ट या कारमध्ये आहे. इतकेच नाही तर कारला डायनॅमिक मार्गदर्शक तत्त्वांसह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

काही आठवड्यांपूर्वी, Tata Motors ने Tiago चे XT व्हेरिएंटला देखील अपडेट केले होते. या मिड-स्पेक व्हेरियंटची किंमत 15,000 रुपयांनी वाढवून अनेक वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. यात आता स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्ससह 3.5-इंच हरमन इन्फोटेनमेंट सिस्टम, हाइट-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि फॉग लॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

या कारच्या इंजिनबद्दल सांगायचे झाले तर, Tata Tiago मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे पेट्रोल इंजिन 85bhp आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन पाच-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिटशी जोडलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -