ताजी बातमी ऑनलाईन टीम
उत्तम गोलंदाजी अन् फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या वन-डे (IND vs ZIM) सामन्यातही झिम्बाब्वेला नमवले. भारतीय संघाने 5 विकेटस् राखून विजय मिळवताना मालिकेतही 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. शार्दूल ठाकूरने मिळालेल्या संधीचे सोने करताना 3 विकेटस् घेतल्या.
पहिल्या वन-डेत झिम्बाब्वेने 189 धावा केल्या होत्या; परंतु आज त्यापेक्षाही कमी धावा झाल्या. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 161 धावांत माघारी परतला. याचे प्रत्युत्तर देताना सलामीला आलेला कर्णधार के. एल. राहुल 1 धावा करून माघारी परतला. शिखर धवन, शुभमन गिल, संजू सॅमसन व दीपक हुडा यांनी चांगली फलंदाजी करून संघाचा विजय पक्का केला. ईशान किशनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
तोही बऱ्याच दिवसांनी मैदानावर उतरला होता; पण तो 6 धावांवर बाद झाला. गिलसह त्याने 34 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन व दीपक हुडा यांनी 56 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. हुडा 25 धावांवर बाद झाला. संजूने षटकार खेचून भारताचा 5 विकेटस् राखून विजय पक्का केला. त्याने 39 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 43 धावा केल्या.