गणेशमूर्ती आगमन, तसेच विसर्जन मिरवणुकीचे ड्रोनद्वारे चित्रीकरण (filming) करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या सुरक्षिततेचे उपाय योजण्यात आले असून मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
मंडळांची माहिती घेणार
कोणीही आक्षेपार्ह कमानी, पोस्टर लावू नयेत. कोणता (filming) देखावा सादर करण्यात येणार आहे, याची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला कळवावी. साऊंड सिस्टीमबाबत नियमबाह्य कोणतीही कृती करू नये, यासाठी सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंडळांच्या ठिकाणी माहिती घेतील.
विसर्जन मिरवणुकीत वेळेचे बंधन
मिरवणूक रेंगाळत न ठेवता सर्व मंडळांना येथे संधी देण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे पोलिस अधीक्षक बलकवडे म्हणाले. तगडा बंदोबस्त जिल्ह्यातील पोलिसांसोबत बाहेरील पोलिस अधिकाऱ्यांनाही विसर्जन मिरवणुकीसाठी बोलाविण्यात येणार आहे. 1700 होमगार्ड, राज्य राखीव दलाची तुकडीही यात समाविष्ट करण्यात येणार आहे.
हद्दपारीची कारवाई
गणेशोत्सवापूर्वी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. हे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले असून याला दोन दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.