Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर हुन धावणार अक्कलकोट आणि गाणगापूरसाठी रेल्वे गाडी

कोल्हापूर हुन धावणार अक्कलकोट आणि गाणगापूरसाठी रेल्वे गाडी

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी तसेच गाणगापुर येथील श्री. दत्त महाराजांच्या दर्शनासाठी कोल्हापूर कलबुर्गी ही नवी (railway board) रेल्वे गाडी लवकरच धावणार आहे.

शिवाय पंढरपुरातील विठ्ठल भक्तांसाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे. नुकतेच केंद्रीय (railway board) रेल्वे बोर्डाकडून या गाडीस मंजुरी मिळाली आहे.

कोल्हापूर – कलबुर्गी (गाडी क्रमांक २२१५६) तर कलबुर्गी- कोल्हापूर ( गाडी क्रमांक २२१५५) हा आहे. कोल्हापूर कलबुर्गी ही गाडी कोल्हापूर येथून दुपारी ३ वाजता सुटेल आणि रात्री १० वाजून ४५ मी. पोहचेल, कलबुर्गी – कोल्हापूर ही गाडी कलबुर्गी येथून सकाळी ६ वाजून ४० मिनीटांनी सुटून कोल्हापूर येथे दुपारी २ वाजून १५ मिनीटांनी पोहचेल. या गाडीस कोल्हापूर, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज , पंढरपूर, कुर्ल्डवाडी, सोलापूर, अक्कलकोट रोड, गाणगापूर रोड, कलबुर्गी या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -