अचानक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हा एक चांगला पर्याय मानला जातो. सध्या लोन देणाऱ्या ॲप्सचा ट्रेंड वाढताना पाहायला मिळतोय. इथे कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक लोन घेत असतात. फेसबुक, इंस्टाग्रामवर आपणदेखील या Loan Apps च्या जाहिराती बघितल्या असतील. यांपैकी 2000 ॲप्स आता गूगल प्ले स्टोअरवरून हटवले असल्याची बातमी समोर आली आहे.
कर्ज घेणे आजकालच्या दिवसांत अवघड असते. त्यासाठी CIBIL Score चांगला असणे म्हणजेच 700 किंवा 750 च्या पुढे असेल व इतर बाबी ठीक असतील तर पर्सनल लोन भेटण्यास अडचण येत नाही. पण Google Play Store वर असे काही ॲप्स तुमची गरज विना सिबील स्कोअर पाहून भागवतील किंवा काही तुम्ही दिलेल्या माहितीचा दुरुपयोग करतात. ते इतर कंपन्यांना विकतात. याचसोबत काही लोन देणाऱ्या कंपन्यांचे ॲप्स त्यांच्याकडून लोन घेणाऱ्याकडून 12 टक्क्यांपासून 36-40 टक्क्यांपर्यंत असं भरमसाठ व्याज घेते.
साधारणतः 24 टक्क्यांपर्यंत व्याज काही नामांकित कंपन्यांचे ॲप्स घेत असतात. या ॲप्स संबंधित माहीती, पत्ता, वेबसाईट, कस्टमर केअर नंबर, मेल आयडी अशी काही माहीती पडताळून पाहणे गरजेचे असते. अन्यथा आपली बँक अकाऊंट डिटेल काही फेक लोन ॲप्स चोरतात किंवा विचारतात. RBI ने म्हटलं की, लोकांना सावध राहणे गरजेचे आहे, नाहीतर अशा डिटेल्स सुरक्षित राहू शकणार नाही.
तर इतर काही Fake Loan Apps मध्ये या डिटेल्स नसतात किंवा तक्रारीसाठी मेसेज बॉक्स असतो किंवा फक्त मेल आयडी असतो. मग अशा वेळेस लोन घेतल्यानंतर काही तांत्रिक समस्या आल्यास किंवा कुणी लोन घेतल्यानंतर हप्ता ट्रान्सफर करताना समस्या आल्यास काही कंपन्या पैसे न आल्याचा बनाव करतात आणि पुन्हा पैसे लाटतात. म्हणून कर्ज घेण्याआधी स्वत:ला मानसिकरीत्या तयार करा.
गुगलने आता अशा अनेक कर्ज देणाऱ्या ॲप्सवर कारवाई करत अलर्ट जारी केला आहे. असं करून या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून गुगलने आतापर्यंत 2,000 लोन ॲप्स हटवले आहेत. गुगलने सांगितलं की, असे Apps आम्ही बनवलेल्या नियम आणि अटींचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. ते ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवत नसल्याचं आढळलं आहे. यासोबतच हे अधिकृत नोंदणी नसलेले ॲप्स ग्राहकांना चुकीची माहीती आणि जाहिरात दाखवून आकर्षित करतात. आपल्याबद्दल खरी माहीती लपवतात आणि कर्जावर जास्त व्याजदर आकारतात. गूगल नेहमीच यूजर्सच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा आणि डिजिटल गुन्हे घडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते. यामुळे अशा ॲप्सवर कारवाई केल्याचं गुगलने म्हटलं आहे.