भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी मेटा आणि रिलायन्स रिटेल सोबत काम करणार असल्याची घोषणा केली. या दोन्ही कंपन्या एकत्ररित्या जिओमार्टची सेवा व्हॉट्सॲपवर देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे ग्राहकांना व्हॉट्सॲपवर खरेदी करता येईल.
मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं की, भारतात जिओसोबत आमची भागिदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. WhatsApp वर आमचा हा पहिला ‘एंड-टू-एंड शॉपिंग’ अनुभव आहे. आता लोकांना व्हॉट्सॲपवर शॉपिंचा अनुभव (Consumers can start shopping on JioMart via WhatsApp) घेता येणार आहे. भारतातील लोकांना आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जिओमार्टवरून किराणा खरेदी करता येणार आहे.
मुकेश अंबानी यांनी म्हटलं की, जिओमार्टमुळे लाखो व्यवसाय ग्राहकांशी जोडले जातील. ग्राहकांना देखील घरबसल्या आपला किराणा मिळणार आहे. 2.32 लाख नोकऱ्या आजवर रिलायन्स रिटेलने दिल्या असून आता भारतातील सर्वात मोठी नोकरी निर्माण करणारी ही कंपनी बनली आहे.
लवकरच सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचणार…
पुढील काही दिवसांत जिओमार्ट ऑनलाईन दुकानदारांना व्हॉट्सॲपवरील जिओमार्टच्या किराणा यादीशी जोडेल. तसेच जर ग्राहकांना खरेदी करायची असल्यास Jiomart च्या चॅटबॉटवर संपूर्ण किराणा कॅटलॉग पाहणे, यादीतील वस्तू ‘कार्ट’मध्ये टाकून म्हणजेच ज्या वस्तू हव्यात त्या सिलेक्ट करून यादी करणे आणि ग्राहक पैसे भरून ऑर्डर पूर्ण करू शकतात.
व्हॉट्सॲपवर जिओमार्ट नंबर +917977079770 हा नंबर सेव्ह करा आणि या नंबरवर वर ‘Hi’ असा मेसेज पाठवून ग्राहक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शॉपिंगला सुरुवात करू शकतात. यासोबतच पुढे पिन कोड, पत्ता व इतर आवश्यक माहीती टाकून खरेदी करू शकता. काही वेळात तुमचे किराणा सामान तुमच्या पत्तावर पोहोचवले जाईल. सध्या ही सेवा प्रायोगिक काही ठिकाणी चालू आहे आता ती काहीच दिवसांत प्रत्येक शहरापर्यंत पोहोचवण्याचे कंपनीचे प्रयत्न आहे.