आशिया चषकामध्ये (Asia Cup 2022) आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा (IND vs HK) 40 धावांनी पराभव केला. यासह भारताने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. तत्पूर्वी नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात दोन विकेट्स गमावून 192 धावा केल्या होत्या.
प्रथम फलंदाजी करताना भारताने हाँगकाँगला विजयासाठी 193 धावांचं लक्ष्य दिलं असताना हाँगकाँगविरुद्ध भारताचा स्टार युवा फलंदाज सुर्यकुमार यादव (Surykumar Yadav) ची तडाखेबाज खेळी पाहायला मिळाली. सुर्यकुमार यादवने 26 चेंडूत 68 धावांची वेगवान वादळी खेळी केली. तुफान फलंदाजी आणि त्यानंतर ताबडतोड गोलंदाजीच्या जोरावर भारताने हाँगकाँगला 40 धावांनी पराभूत केलं आहे.
त्यापाठोपाठ गेल्या कित्येक महिन्यांपासून संघात स्थान मिळत असताना देखील आपल्या खेळीने प्रभावित न करणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) ने कालच्या हॉंगकाँगविरुद्धच्या सामन्यात आशिया चषकातील चौथ्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं आहे. यामुळे कोहलीचा फॉर्म परतल्याच्या चर्चा चालू झाल्या आहेत. तर प्रत्युत्तरात हॉंगकॉंग संघाकडून खेळताना बाबर हयातने 41 धावांची सर्वोत्तम खेळी केली. हाँगकाँगच्या संघाला 20 षटकात 152 धावापर्यंत मजल मारता आली.
पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय आणि काल हाँगकाँगविरुद्ध दुसऱ्या विजयाची नोंद करत भारत आता सुपर-4 फेरीत पोहोचला आहे. अफगाणिस्तान देखील सुपर-4 साठी नुकताच पात्र ठरला आहे.
भारताची फलंदाजी व गोलंदाजी:
▪️ के एल राहुल – 39 चेंडूत 36 धावा (2 षटकार)
▪️ रोहित शर्मा – 13 चेंडूत 21 धावा (2 चौकार, 1 षटकार)
▪️ सुर्यकुमार यादव – 26 चेंडूत 68 धावा ( 6 चौकार, 6 षटकार)
▪️ विराट कोहली – 44 चेंडूत 59 धावा (1 चौकार, 3 षटकार)
▪️ भुवनेश्वर कुमार – 1 विकेट
▪️ आवेश खान – 1 विकेट
▪️ अर्षदीप सिंह – 1 विकेट
▪️ रविंद्र जडेजा – 1 विकेट