Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर शहरातील घरगुती गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी, 114 ठिकाणी 160 कुंडांची व्यवस्था

कोल्हापूर शहरातील घरगुती गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी, 114 ठिकाणी 160 कुंडांची व्यवस्था

कोल्हापूर शहरातील दीड दिवसांच्या तसेच अनंत चतुर्दशी होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी कोल्हापूर महानगरपालिकेकडून तयारी करण्यात आली आहे. मनपाच्या चार विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात 25 ठिकाणांवर कृत्रिम कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव, कळंबा तलाव, तसेच अन्य तलावांमध्ये गणेशमूर्ती थेट विसर्जित करू नयेत यासाठी महापालिकेकडून कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था केली असून शहरवासीयांकडून त्याला प्रतिसाद मिळत आहे.
सोमवारी होणाऱ्या घरगुती गणेश विसर्जनासाठी शहरात 114 ठिकाणी 160 कुंडांची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रभागात गरजेनुसार एक ते चार कुंड ठेवले आहेत. तसेच अनंत चतुदर्शी दिवशी 25 ठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे.

पाणी प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध प्रभागांसह रंकाळा सभोवती ६ कुंड ठेवले आहेत. आज दीड दिवसांचे गणपती विसर्जित केले जाणार आहेत. त्यासाठीही कुंड तयार आहेत.

अनंत चतुर्दशीला या ठिकाणी सोय असेल

विभागीय कार्यालय 1
• क्रांतिसिंह नाना पाटील चौक, निकम पार्क नजीक, मलखड्डा निर्माण चौक, जरगनगर कमानी समोर, क्रशर चौक, पांडुरंग हॉटेलजवळ पतौडी खण, राज कपूर पुतळ्याजवळ

विभागीय कार्यालय 2
• तोरस्कर चौक, गंगावेस चौक, पंचगंगा नदी घाट, बिंदू चौक, मिरजकर तिकटी

विभागीय कार्यालय 3
• व्यापार पेठ पाण्याची टाकी, कोटीतीर्थ तलाव, राजारामपुरी
9 वी गल्ली रेणुका मंदिर, राजारामपुरी जगदाळे हॉल, टेंबलाई मंदिर, सायबर चौक, मनोरा हॉटेल पिछाडीस

विभागीय कार्यालय 4
• सासने ग्राउंड, नर्सरी बाग, दत्त मंदिर कसबा बावडा, प्रिंन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -