Monday, August 4, 2025
HomeमनोरंजनSalman Khan च्या घरी गणपतीला आलेल्या Riteish Deshmukh च्या मुलांचे 'या' कारणामुळे...

Salman Khan च्या घरी गणपतीला आलेल्या Riteish Deshmukh च्या मुलांचे ‘या’ कारणामुळे होतेय कौतुक!

कोरोनामुळे (Corona Virus) तब्बल दोन वर्षांनंतर यावर्षी गणेशोत्सव (Ganeshostav 2022) मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. घराघरामध्ये बाप्पा विराजमान झाले असून गणेशभक्त बाप्पाची सेवा करण्यामध्ये दंग आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत केले. सलमान खानच्या (Salman Khan) घरी देखील बुधवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले. त्याच्या बाप्पाची दरवर्षी चांगली चर्चा होत असते. सलमानच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात.

यावर्षी सलमान खानच्या घरी नाही तर त्याची बहीण (Arpita Khan Sharma) अर्पिता खान शर्माच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. सलमान खानचे सर्व कुटुंबीय बाप्पाची सेवा करण्यामध्ये व्यग्र असून घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी सलमान खानच्या खास मित्रांनी गणपती बाप्पाच्या दर्शनसाठी हजेरी लावली. बॉलिवूडचा सुपरस्टार रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनिलिया यांनी आपल्या दोन्ही मुलांसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली.

रितेश, जेनिलियाने आणि त्यांची मुलं रिआन आणि राहील हे यावेळी खूपच सुंदर दिसत होते. चौघांनी देखील एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते. जेनिलियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर रितेश आणि त्याच्या मुलांनी कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. मीडिया प्रतिनिधी फोटो काढत असताना यावेळी रितेशच्या दोन्ही मुलांनी सर्वांची मनं जिंकली. कॅमेऱ्यासमोर पोझ देताना रिआन आणि राहीलने सर्वांना हात जोडून नमस्कार केला.

रिआन आणि राहीलच्या चेहऱ्यावर असलेले स्मितहास्य आणि जोडलेले हात असे रुप खूपच सुंदर दिसत होते. या दोघांचे सध्या खूप कौतुक होत आहे. त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ पाहून नेटिझन्स दोघांचे देखील खूपच कौतुक करत आहेत. ऐवढंच नाही तर आपल्या मुलांना इतके चांगले संस्कार देणाऱ्या रितेश आणि जेनिलियाचे देखील कौतुक केले जात आहे. यावेळी गणेशोत्सव सलमानच्या घरचा आणि चर्चा मात्र रितेशच्या मुलांची झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -