Saturday, July 26, 2025
Homeअध्यात्मबाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करा टेस्टी उंदलकाल, सोप्या पद्धतीने करा तयार!

बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करा टेस्टी उंदलकाल, सोप्या पद्धतीने करा तयार!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गणेशभक्तांच्या आवडीचा सण गणेशोत्सव सध्या सुरु आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवस खूपच आनंदाचे असतात. आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे. या सणामध्ये बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते आणि बाप्पाचे आवडते पदार्थ तयार केले जातात. बाप्पासाठी मोदक लाडूपासून (Ladoo) मीठाईपर्यंत अनेक पदार्थ तयार केले जातात. पण आज आम्ही तुम्हाला बाप्पासाठी एक वेगळाच नैवेद्याचा प्रकार सांगणार आहोत. आज आपण कोंकणी पदार्थ उंदलकाल कसा तयार करायचे हे जाणून घेणार आहोत. गणेशोत्सवा दरम्यान कोकणात बाप्पासाठी उंदलकाल हा पदार्थ तयार केला जातो. उंदलकाल चवीला मोदकासारखाच लागतो. पण हे उंदलकाल अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट लागतात. अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट हे उंदलकाल तयार होतात. ते कसे करायचे आणि त्याची परफेक्ट रेसिपी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत…

उंदलकाल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –
– एक कप पाणी
– एक कप तांदळाचे पीठ
– एक चमचा गूळ
– साजूक तूप
– अर्धा कप नारळाचा चव
– सुका मेवा (काजू आणि बदामचे तुकडे)
– वेलची पूड
– जायफळ पूड

अशा पद्धतीने तयार करा उंदलकाल –
कढईमध्ये एक कप पाणी टाका. त्यामध्ये एक चमचा गूळ आणि एक चमचा साजूक तूप टाका. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक कप तांदळाचे पीठ टाका. गॅस मंद आचेवर ठेवून पाणी आणि पीठ व्यवस्थित मिक्स करा. गॅस बंद करुन पाच मिनिटं असंच झाकून ठेवा. एका प्लेटमध्ये उकड काढून घ्या. हे पीठ व्यवस्थित मळून घ्या. घट्टसर गोळा तयार झाल्यानंतर त्याचे मोत्यांच्या आकाराचे छोटे-छोटे गोळे तयार करुन घ्या. तव्यामध्ये तूप गरम करुन घ्या. हे गोळे शालो फ्राय करुन घ्यायचे आहे. मस्त खरपूस होईपर्यंत हे गोळे फ्राय करा. या गोळ्यांना सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करुन झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्या. अतिशय खुसखुशीत हे गोळे तयार होतात. उंदलकालसाठी गोळे फ्राय करुन घेतल्यानंतर उतरलेल्या तूपामध्ये सुका मेवा (बदाम आणि काजूचे तुकडे टाका) टाका. यामध्ये अर्धा कप ओल्या नारळाचा चव टाका. नारळाचा चव परतल्यामुळे त्याचा ओलसरपणा कमी होतो. त्यानंतर यामध्ये जेवढा नारळाचा चव आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घालयचा आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित हालवून घ्या. यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड मिक्स करा. गूळ असल्यामुळे जायफळ टाकल्यामुळे पदार्थाचा स्वाद आणखी वाढतो. त्यानंतर आता उंदलकालसाठी तयार केलेले गोळे यामध्ये टाकायचे. सर्व मिश्रण व्यवस्थित हालवून घ्या. त्यावर गार्निशसाठी सुकामेवा टाका. अशापद्धतीने खाण्यासाठी उंदकाल तयार होतात आणि ते अतिशय चविष्ट लागतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -