Friday, July 25, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : अवघ्या १२ तासाच्या आत मोटारसायकल चोरट्यास मुद्देमालासह जेरबंद

Kolhapur : अवघ्या १२ तासाच्या आत मोटारसायकल चोरट्यास मुद्देमालासह जेरबंद

शिरोळ पोलीसांनी नांदणी येथून चोरीस गेलेली मोटर सायकलचा शोध घेऊन अवघ्या 12 तासाच्या आत मोटरसायकल चोरटा वाहिद रहीम पिंजारी उर्फ नदाफ (रा. नांदणी) यास अटक करून चोरीची मोटरसायकल जप्त केली.
शिरोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८
ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत नांदणी ते हरोली जाणाऱ्या रस्त्याचे कडेला पार्क केलेली हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटर सायकल नं. एम.एच.०९ डी.जी. ५१८२ चोरीला गेली होती.

या गुन्हयाबाबत बातमीदारमार्फत बातमी काढून सदर गुन्हयातील संशयीत आरोपी वाहीद रहीमान पिंजारी उर्फ नदाफ व. व. २७, रा. गैबी पिराजवळ, नांदणी याचा सदर गुन्हयात सहभाग असलेबाबत खात्री झाली. आरोपीस सापळा रचुन नांदणी माळभाग परीसरातुन शिताफीने ताब्यात घेतले.

सदर गुन्हयाबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हयाची कबुली दिली. २०,००० रुपये किंमत असलेली हस्तगत करण्यात आली आहे. सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास २ दिवस पोलीस कोठडी सुनावली गेली. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिलीप कुंभार हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -