आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022) ग्रुप ए मधील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने इतिहास रचला. या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगला (Pakistan Vs Hongkong) 155 धावांनी पराभव करत सुपर 4 मध्ये एन्ट्री मिळवली आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर आता सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) आमने-सामने आले आहे. 4 सप्टेंबर म्हणजे रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला रंगणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँगमध्ये जबरदस्त सामना रंगला होता. पाकिस्तानने आधी फलंदाजी करत हाँगकाँगपुढे 194 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, हाँगकाँगला पाकिस्तानने दिलेल्या आव्हानापर्यंत पोहचता आले नाही. हाँगकाँगला 38 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशा पद्धतीने तब्बल 155 धावांच्या मोठ्या फरकाने पाकिस्तानने विजय मिळवत इतिहास रचला. पाकिस्तानने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या धावसंख्येच्या फरकाने हा विजय मिळवला.
सामन्या दरम्यान पाकिस्तानप्रमाणेच हाँगकाँगच्या खेळाची सुरुवात ही सुरुवातीलाच खराब झाली. 30 धावांच्या आतच हाँगकाँगचे 5 खेळाडू बाद झाले. हाँगकाँगच्या निझाकत खानने सर्वाधिक 8 धावा केल्या. तर ऐजाज खान हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने 3 षटकात सर्वाधिक 44 धावा दिल्या. तर एहसान खानने 4 षटकात 28 धावा केल्या. त्यानंतर हाँगकाँगची टीम फलंदाजीला मैदानात उतरली असता पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत हाँगकाँगच्या एकाही फलंदाजाला जास्त धावा करण्याची संधी दिली नाही. त्यामुळेच 10.4 षटकात हाँगकाँग 38 धावांवर सर्वबाद झाला आणि पाकिस्तानचा दणदणीत विजय झाला.
आशिया चषक 2022 सुपर-4 चे असे आहे वेळापत्रक
– अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका – 3 सप्टेंबर 2022
– भारत विरुद्ध पाकिस्तान – 4 सप्टेंबर 2022
– भारत विरुद्ध श्रीलंका – 6 सप्टेंबर 2022
– अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान – 7 सप्टेंबर 2022
– भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 8 सप्टेंबर 2022
– श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान – 9 सप्टेंबर 2022