समाज आपलं नातं स्वीकारणार नाही यामुळे एका प्रेमीयुगुलांनी ट्रेनसमोर उडी मारुन आपले जीवन संपवले आहे. नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना (Nagpur News) घडली आहे. हावडा- नागपूर- मुंबई या ट्रेनसमोर (Howrah- Nagpur- Mumbai Train) उडी मारुन या प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली आहे. खापरी ते गुमगावदरम्यान त्यांनी ट्रेनसमोर उडी मारली. या प्रेमीयुगुलांना लग्न करयाचे होते पण नाती आडवी येत होती आणि समाज आपल्या नात्याला स्वीकारणार नाही त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र काशिराम नेवारे (35 वर्षे) आणि स्वाती पप्पू बोपचे (19 वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांची नावं आहेत. जितेंद्र आणि स्वाची यांचे प्रेमसंबंध होते. स्वाती ही जितेंद्रच्या मावस भावाची मुलगी होती. जितेंद्रचे लग्न झाले होते पण त्याची पत्नी वर्षभरापूर्वी घर सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तो आपल्या आईसोबत राहत होता. तो पाण्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. नातेवाईक असल्यामुळे स्वाती जितेंद्र यांच्या घरी येत होती. याचवेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
जितेंद्र आणि स्वाती एकमेकांना नेहमी भेटायचे. बुधवारी स्वाती नागपूरला जितेंद्रला भेटायला आली होती. दोघे दिवसभर सोबत होते. पण त्यानंतर गुरुवारी सकाळी आठच्या सुमारस दोघांचे मृतदेह रेल्वेलाईनच्या जवळ आढळून आले. त्यांच्या कॉल लागत नसल्यामुळे दोघांचेही कुटुंबीय चिंतेत होते. जितेंद्रच्या आईला त्यांच्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे जितेंद्रच्या आईने पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
जितेंद्र आणि स्वातीने हावडा- नागपूर- मुंबई रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली. त्यांनी खापरी ते गुमगाव दरम्यानच्या संदेश सिटीजवळ रेल्वेसमोर उडी मारली. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांना दोघांचे मृतदेह सापडले पण त्यांची ओळख पटत नव्हती. घटनास्थळी पोलिसांना त्यांचा तुटलेला अवस्थेतील मोबाईल सापडला. या मोबाईलमधील क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी जिंतेंद्रच्या आईला संपर्क केला आणि घटनेची माहिती दिली. जितेंद्र आणि स्वातीला लग्न करायचे होते. पण समाज आपले नाते स्वीकारणार नाही म्हणून त्यांनी सोबत रेल्वसमोर उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे जितेंद्र आणि स्वातीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.