Monday, August 4, 2025
Homeमहाराष्ट्रआज 5 दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन, बीएमसीने केली अशी जय्यत तयारी!

आज 5 दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन, बीएमसीने केली अशी जय्यत तयारी!

राज्यात गणेशोत्सवाचा (Ganeshostav 2022) यावर्षी एक वेगळाच आनंद आहे. अशामध्ये बघता बघता गणेशोत्सवाचा पाचवा दिवस असून आज पाच दिवसांचे बाप्पा (5 Days Ganpati Bappa) निरोप घेणार आहे. पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनसाठी मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) मुंबईतील समुद्र किनारे (Mumbai Beaches) आणि तलावांच्या (Mumbai Lakes) ठिकाणी विसर्जनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिकेकडून मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्र किनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची (Ganpati Visarjan 2022)तयारी मुंबई महापालिकेने केली आहे.

मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 10 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी आणि प्रमुख विसर्जन स्थळी 786 जीव रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

– समुद्रकिनारी आणि प्रमुख विसर्जन स्थळी 786 जीव रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

– नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे 45 मोटार बोट आणि 39 जर्मन तराफांची व्यवस्था करण्यात आली आहे.

– सुसमन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत.

विसर्जनस्थळी अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी 3 हजार 069 फ्लड लाईट आणि 71 सर्च लाईट व्यवस्था करण्यात आली आहे.

– महत्त्वाच्या विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे 188 प्रथमोपचार केंद्र आणि 83 रुग्णवाहिका असणार आहेत.

– निर्माल्यापासून खत तयार करण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे 357 निर्माल्य कलश आणि 287 निर्माल्य वाहने विसर्जनस्थळी असणार आहेत.

अधिक चांगल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी 48 निरिक्षण मनोरे आणि आवश्यक तेथे संरक्षक कठडे उभारण्यात आली आहेत.

– महत्त्वाच्या विसर्जन स्थळी 134 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

– श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

– चौपाट्यांवर श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येणा-या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत यासाठी 460 पौलादी प्लेटची व्यवस्था करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे.

– बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सुमारे 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी यांना श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कार्यतत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

समुद्र किनाऱ्यावर विशेष व्यवस्था

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -