कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी १५ नवे कोरोना बाधित आढळून आले तर १३ जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता १०१ झाली आहे. मात्र कोरोनामुळे शनिवारी एकही बळी नाही.शनिवारी आढळून आलेल्या १५ नव्या बाधितांमध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात १०,इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात २, तर गगनबावडा १ आणि करवीर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण २ लाख २१ हजार ४१७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १५ हजार ३८८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ९२८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा सक्रीय रुग्ण १०१ आहेत. यापैकी ८ जण दवाखान्यात उपचार घेत आहेत.