Monday, August 4, 2025
Homeसांगलीकुपवाडला चोरट्याकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; चार तासांत संशयित गजाआड

कुपवाडला चोरट्याकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; चार तासांत संशयित गजाआड

कुपवाड शहरातील उल्हासनगर भागातील दुय्यम । उपनिबंधक कार्यालयालगत असलेले युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्याने शुक्रवारी मध्यरात्री लोखंडी रॉडने फोडण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांकडून तांत्रिक पुराव्याच्या आधारे चार तासाच्या आत संशयितास लोखंडी रॉडसह जेरबंद करण्यात आले.
मोन्या ऊर्फ अनिकेत गणेश व्हनकडे (वय १८, रा. हनुमाननगर कुपवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. कुपवाडमध्ये दुय्यम उपनिबंधक कार्यालयालगत युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. शुक्रवारी मध्यरात्री संशयित अनिकेत व्हनकडे याने लोखंडी रॉडच्या सहायाने एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु ही किचकट प्रक्रिया असल्याने त्याला हे फोडता आले नाही.

त्याचा हा प्रयत्न असफल होऊन पैशाऐवजी स्क्रीन बाहेर आले. यावेळी एटीएम मशीन फुटले असते तर मशीनमधील १३ लाख रुपये संशयित व्हनकडे याच्या हाती लागले असते.सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके संशयिताच्या शोधासाठी रवाना केली. पोलिसांनी अवघ्या चार तासातच संशयित अनिकेत व्हनकडे यास लोखंडी रॉडसह जेरबंद केल

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -