Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; पंचगंगा नदीत घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी?

कोल्हापूर ; पंचगंगा नदीत घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी?

ताजी बातमी ऑनलाईन टीम


कोल्हापूर : पंचगंगा नदीत घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी पूर्ण केली असून शनिवारी नदी घाटाकडे जाणारे मार्ग बॅरिकेडस् लावून अडविण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड ठेवले असून त्यात भाविकांनी मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, नदीत मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही स्थितीत पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी दिली.



घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने कोल्हापूर शहरात पंचगंगा नदी घाटासह 180 ठिकाणी गणेश विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत. त्याबरोबरच तब्बल 1200 अधिकारी-कर्मचारी सोमवारी रस्त्यावर असणार आहेत. इराणी खणीसह शहरात ठिकठिकाणी महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवानही तैनात ठेवण्यात आले आहेत.

महापालिकेच्या पवडी विभागाचे 225 कर्मचारी, आरोग्य विभागाचे 650 कर्मचारी व आरोग्य निरीक्षकांची 16 पथके, 90 टेम्पो 200 हमालांसह, 10 डंपर, 24 ट्रॅक्टर-ट्रॉली व 5 जे.सी.बी., 7 पाण्याचे टँकर, 2 रोलर, 2 बूम अशी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी साधनसामग्रीसह तैनात असणार आहेत. विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आली असून आरोग्य विभागाच्या वतीने साफसफाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी मूर्ती व निर्माल्य अर्पण/फेर विसर्जन करण्याबाबत प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -