Friday, January 30, 2026
Homeक्रीडाविराटची अर्धशतकी खेळी व्यर्थ, रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा विजय

विराटची अर्धशतकी खेळी व्यर्थ, रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा विजय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अखेरच्या षटकातील थरारानंतर पाकिस्तानच्या संघाने आशिया चषक स्पर्धेतील सामन्यात भारताचा पाच विकेट राखून पराभव केला. बाबर आझमच्या संघाला शेवटच्या षटकात सात धावांची गरज होती. पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र सामन्यात एक वेळ अशी आली जेव्हा पाकिस्तानला दोन चेंडूत दोन धावा हव्या होत्या. परंतु एक चेंडू आधी बाबर अँड कंपनीने सामना जिंकला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 51 चेंडूत सर्वाधिक 71 धावांची खेळी खेळली. मोहम्मद नवाजनेही 20 चेंडूत 42 धावा केल्या. विराट कोहलीच्या 44 चेंडूत केलेल्या 66 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 181 धावा केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -