Wednesday, July 30, 2025
Homeराजकीय घडामोडीउद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवा, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी थोपटले दंड

उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवा, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी थोपटले दंड


भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत आहे. अमित शाह यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दंड थोपटल्याचे यावेळी पाहायला मिळाले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत केवळ भाजपचं (BJP) वर्चस्व केवळ भाजपचं असायला हवं. उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, अशा शब्दांत अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.

अमित शाह म्हणाले, राजकारणात सगळं काही सहन करा, मात्र घात होत असेल तर सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. आगामी काळात मुंबईच्या राजकारणात केवळ भाजपचं असायला हवे. उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. अशा शब्दांत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

अमित शाह आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अमित शाह यांनी शिवसेनेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांचा देखील चांगलाच समाचार घेतला. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आता मैदानात उतरण्याची गरज आहे. सन 2019 मध्ये भाजपला पहिल्यांदा संपूर्ण बहुमत मिळालं होतं. शिवसेनेने केवळ 2 जागांसाठी भाजपसोबतची युती तोडली होती. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेने युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा अमित शाह यांनी यावेळी गौप्यस्फोट केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -