भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून (Cricket) निवृत्ती जाहीर केली आहे. म्हणजेच आता सुरेश रैनाने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली आहे. रैनाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. यापूर्वी सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्येही खेळत होता. मात्र, मागील आयपीएल 2022 हंगामात रैनाला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नव्हते.
सोशल मीडियावर दिली माहिती
सुरेश रैनाने आपल्या निवृत्तीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. त्याने ट्विट करून लिहिले, ‘माझ्या देशाचे आणि माझ्या राज्य उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू इच्छितो. मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन चेन्नई सुपर किंग्ज, राजीव शुक्ला सर आणि माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो.’
रैना लिजेंड्स क्रिकेट लीग खेळू शकतो
रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, सुरेश रैना आता परदेशी लीगमध्येही खेळताना दिसणार आहे. त्याने यूपी क्रिकेट असोसिएशनकडून एनओसी घेतली आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगही परदेशी लीगमध्ये खेळला आहे. असेही सांगण्यात येत आहे की, सुरेश रैना देखील यावर्षी होणाऱ्या लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
सुरेश रैनाने सर्व फॉर्मेटच्या क्रिकेटमधून घेतला संन्यास, आता आयपीएलही खेळणार नाही!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -