ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेना कोणाची यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. या संदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर उद्याच म्हणजे बुधवारी घटनापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावर लवरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेतील एकतृतीयांशहून अधिक आमदारांसह वेगळा गट स्थापन केला आहे. तसेच आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील खरी शिवसेना आमची आहे आणि दुसरा गट गद्दारांचा आहे अशी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले आहे. या प्रकरणावर सुनावणीसाठी आता सुप्रीम कोर्टाने खंडपिठाची स्थापना केली आहे. त्यामुळे या वादावर आता लवकर निर्णय येणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान सोमवारी केंद्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला आव्हान दिले आहे. शाह यांच्या दौऱ्यानंतर शिंदे गटातही उत्साह आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊन रिट याचिका दाखल केली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये आणि या प्रकरणावर त्वरीत सुनावणी घ्यावी अशी विनंती शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
मोठी बातमी! ठाकरे-शिंदे गटाच्या वादावर सुनावणीसाठी उद्याच स्थापन होणार घटनापीठ!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -