ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा या जोडीने काही काळ पडद्यावर राज्य केले. या दोघांची ऑन स्क्रिन जोडी प्रेक्षकाच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. अक्षय आणि प्रियंका यांनी ऐतराज, मुझसे शादी करोगी, वक्त यासारख्या काही हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. परंतु ‘वक्त’नंतर ही जोडी पुन्हा कधीच एकत्र दिसली नाही. वक्त चित्रपटानंतर दोघांनी पुन्हा एकत्र काम केले नाही. परंतु प्रियंका आणि अक्षयच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. का या दोघांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसणार आहे.
तब्बल 17 वर्षांनी रिलीज झालं गाणं
अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांचं एक गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. हे गाणे 17 वर्षांनंतर रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्ये म्हणजे हे गाणे 2005 मध्ये शूट करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी आता 2022 मध्ये हे गाणं रिलीज झालं आहे. प्रियंका आणि अक्षय यांनी ‘बरसात’ चित्रपटासाठी हे गाणं शूट केलं होतं आणि या चित्रपटाचं हे शीर्षक गीत आहे. विशेष म्हणजे हेच गाणं अक्षयनंतर पुन्हा बॉबी देओलसोबत देखील शूट करण्यात आलं आहे.
तब्बल 17 वर्षांनंतर रिलीज झालं अक्षय आणि प्रियंकाचं हे रोमँटिक गाणं, केमिस्ट्री पाहून व्हाल थक्क
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -