Sunday, August 3, 2025
Homeराजकीय घडामोडीउद्धव ठाकरे यांना धक्का! संजय राऊत यांची भेट घेण्यास परवानगी नाकारली

उद्धव ठाकरे यांना धक्का! संजय राऊत यांची भेट घेण्यास परवानगी नाकारली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अशातच ऑर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेण्यास उद्धव ठाकरे यांना परवानगी नाकरली आहे. खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक आहेत. परंतु ऑर्थर रोड जेल प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली आहे.


उद्धव ठाकरे संजय राऊत यांना भेटण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहात जाणार होते. यासाठी त्यांनी फोनवर संपर्क देखील केला होता. परंतु जेल प्रशासनाने त्यांना स्पष्ट नकार दिल्याचे समजते. जेल अधिक्षकांच्या कार्यालयात संजय राऊत यांना भेटायला द्यावे, असा निरोप उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑर्थर रोड कार्यालयाला पाठवण्यात आला होता.मात्र, यावर ऑर्थर रोड कारागृह प्रशासनाने नकार देत अशी भेट घेता येणार नाही. त्यासाठी कोर्टाची परवानगी घेऊन या असा निरोप दिला.

कैद्यांना भेटण्यासाठी जी जागा तिथेच भेटता येईल….
कोर्टाची परवानगी मिळाली तरी इतर कैद्यांना भेटण्यासाठी जी जागा आहे, तिथेच भेटता येईल, असेही देखील जेल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.संजय राऊत यांचे भाऊ देखील कार्यालयात न भेटता कैदी भेटताता त्या जागेतच भेटतात. त्यासाठी देखील कोर्टाची रितसर परवानगी घेऊन भेट घ्यावी, असे देखील ऑर्थर रोड प्रशासनानं कळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -