ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथे एक धक्कादाय घटना समोर आली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीशी लग्न करत गरोदर केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान तिचे अवघ्या साडेबाराव्या वर्षात लग्न झाल्याचेही उघड झाले आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांनी घालून दिलेल्या शिकवणींना गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी वेळी डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी अधिक तपासणी केली. यावरून बालविवाहाचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अल्पवयीन मुलीचा नवरा, आई, वडिलांसह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत ग्रामसेवकांनी पोलिसांना जबाब दिला आहे. ते म्हणाले कि, माझे दऱ्याचे वडगाव व वडवाडी गावात शासनाकडून वेळोवेळी आदेशाचे पालन करून शासनाकडून येणाऱ्या योजना राबविल्या जातात. तसेच मी दऱ्याचे वडगाव व वडवाडी गावात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम पाहत आहे. तपासणी दरम्यान मला एका अल्पवयीन मुलीवर संशय आल्याने मी तिला प्राथमीक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी लावून दिले यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
कोल्हापूर जिल्ह्यातून धक्कादाय घटना समोर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -