ताजी बातमी ऑनलाईन टीम
यंदाचा गणेशोत्सव आनंदाने साजरा व्हावा यासाठी येथील पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील १३ गुन्हेगारांना हातकणंगले तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार कारवाईचा आदेश उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजणे यांनी दिला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी दिली.
पप्या उर्फ प्रविण संभाजी माने (रा.पेठ वडगांव), प्रविण बाबु माने (वय ३० रा.पेठवडगांव), रोहित उत्तमराव पाटील (वय २९,रा भगवा चौक घुणकी), विकास अविनाश धनवडे (वय २५, रा पेठ वडगांव), भगवान राजाराम जाधव (वय ३२, रा.घुणकी), प्रतिक अशोक शिंदे (वय २९, रा पेठ वडगांव), राकेश नवनाथ हाके (वय २५ रा.पेठ वडगांव), विशाल उर्फ लाल्या दिलीप जाधव (वय २३ रा.पेठ वडगांव), वैभव विठठल हिरवे (वय ३९ रा.पेठ वडगांव), विशाल विनायक माने (वय २८ रा.पेठ वडगांव), अनिकेत शंकर सदाकळे (वय २७ रा.मिणचे), महेश अनिल पाल उर्फ वाघीरे . (वय ३२ रा.पेठ वडगांव), रोहित बाळासो पाटील (वय २६ रा. पेठ . वडगांव) अशी हद्दपार कारवाईतील आरोपींची नावे आहेत. कारवाईतील आरोपी दि. ८ ते १० सप्टेंबर रोजी रात्री १२ वा पर्यंत हातकणंगले तालुक्यामध्ये वास्तव्यास असल्याचे दिसुन आलेस तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.